हेल्थ फॉर नीडी या संस्थेच्या माध्यमातून रुग्णसेवा करणाऱ्या सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाउंडेशनच्या माध्यमातून आता एज्युकेशन फॉर नीडी ही नवी संस्था गरजूंना शिक्षण पुरवण्यासाठी सुरू करण्यात आली आहे.
या संस्थेच्या माध्यमातून महिलांना मोफत इंग्रजी बोलण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. इंग्रजीतून संवाद साधण्याची कला, संवाद साधण्याचे नियम, शब्दसंग्रह, वाक्य तयार करणे इंग्रजी व्याकरण आणि इंग्रजीतून इतर संवादाचे शिक्षण ऑफलाइन क्लासेस च्या माध्यमातून दिले जाणार आहे.
प्रत्येक आठवड्याच्या सोमवार ते शनिवार या काळात सायंकाळी सहा ते सात या वेळेत हे प्रशिक्षण वर्ग आयोजित केले जाणार आहेत.
अधिक माहितीसाठी 7259422947,8105638041 या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाऊंडेशनतर्फे करण्यात आले आहे.