कोरोना ची तिसरी लाट आली आणि त्याचे रुग्ण सापडू लागल्यानंतर आता बेळगाव पोलीस दल पुन्हा एकदा कामाला लागले आहे. कोरोना साथीच्या विरोधातील खबरदारीच्या उपाययोजना राबविण्याच्या दृष्टीने पोलीस दलाने जोरदार कामाला सुरुवात केली असून मास्क आणि सामाजिक अंतर यासंदर्भातील नियमाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.
मास्क वापरण्यासाठी साऱ्यांनाच सूचना करण्यात आली असली तरी सध्या बहुतेक लोक विनामास्क फिरत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता मास्क न घातल्यास 250 रुपये दंड भरावा लागणार आहे.
दंडाची पावती घेऊन पोलीस दल कामाला लागले आहे. याच बरोबरीने महानगरपालिकेचे कर्मचारी ठिकठीकाणी चौकाचौकात थांबून मास्क न घालणाऱ्यांना सध्या सूचना करत असून यापुढील काळात दंड भरावा लागणार असल्याचे दिसून येत आहे.
त्यामुळे आता स्वतःच्या आणि इतरांच्या आरोग्याच्या काळजीसाठी प्रत्येकानेच मास्क बाळगणे गरजेचे बनले आहे.