शहापूर शिवाजी उद्यान येथे आज सकाळी अटक करण्यात आलेल्या माजी महापौर शिवाजी सुंठकर आणि शिवसेना जिल्हा प्रमुख माजी उपमहापौर प्रकाश शिरोळकर यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांना शहापूर शहापूर पोलीस ठाण्यात हजर करून त्यांची सुटका करण्यात आली. तथापी काल रात्रीच्या शहरातील दगडफेक प्रकरणी अटक केलेल्या 27 जणांवर प्राणघातक हल्ला केल्याचा ठपका ठेवून 307 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्वांना पोलिसांनी आज न्यायालयात हजर केले असता त्यांची 14 जणांची रवानगी हिंडलगा कारागृहात करण्यात आली आहे.
बेंगलोर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अवमान केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर बेळगाव आणि परिसरात संतापाचा उद्रेक झाला. धर्मवीर संभाजी चौकासह रामदेव गल्ली व इतर ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या. धर्मवीर संभाजी चौकासह कांही ठिकाणी पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक करून नुकसान करण्यात आले. याप्रकरणी याप्रकरणी पोलिसांनी 27 जणांना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अटक केलेल्यांवर प्राणघातक हल्ला केल्याचा ठपका ठेवून भा.द.वि. 307 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे पोलिसांनी सर्व 27 आरोपींना आज न्यायालयासमोर हजर केले असता त्यांची रवानगी हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.
सदाशिवनगर, बेंगळूर येथे शिवरायांच्या पुतळ्यावर काळा रंग ओतून अवमान करण्यात आल्याची घटना उघडकीस आल्यानंतर शिवप्रेमींच्या संतापाची उद्रेक झाला आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी काल रात्री हजारो शिवप्रेमी धर्मवीर संभाजी चौकात जमले होते. संतप्त कार्यकर्त्यांनी या भागातील सर्व रस्ते रोखून धरून बेंगलोर येथील संबंधित समाजकंटकांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली होती.
यावेळी शहरात दगडफेकीच्या घटना घडल्या. त्यामुळे धर्मवीर संभाजी चौक, रामदेव गल्ली, समादेवी गल्ली आणि इतर भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.दरम्यान शिवाजी उद्यानात माजी उपमहापौर रेणू किल्लेकर आदींनी शिवाजी महाराजांच्या मूर्तीचा अभिषेक केला.