Sunday, December 22, 2024

/

चोर्ला घाटात पाच तास कोंडी

 belgaum

बेळगाव ते गोवा या प्रवासासाठी एकमेव मार्ग म्हणून शिल्लक असलेल्या चोर्ला घाटातील मार्गावर सोमवारी तब्बल पाच तास वाहतूक कोंडी चा अनुभव नागरिकांना घ्यावा लागला.

रस्त्यावरील वाहनांमध्ये अडकलेल्या नागरिकांना दुपारी दोन वाजल्यापासून सायंकाळी सात वाजेपर्यंत तसेच अडकून पडावे लागले होते. रविवारीही याच प्रकारचा अनुभव अनेक प्रवाशांना घ्यायला लागला होता. या संदर्भातील अधिक माहिती नगरसेवक रवी साळुंके यांनी दिली आहे.

आज स्वतः पाच तासात या मार्गावर अडकून पडले होते .दरम्यान मागील चार दिवसांपूर्वी या मार्गावर एक ट्रक घाटात कलली होती .त्या कललेला ट्रकला काढण्यासाठी क्रेन आणण्यात आल्या होत्या .या क्रेनच्या माध्यमातून ट्रक काढून मार्गस्थ होईपर्यंत सोमवारी प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागला आहे. Chorla jaam

या मार्गावर कोणत्याही प्रकारच्या सोयी-सुविधा नाहीत. हॉटेल, हॉस्पिटल्स व इतर गोष्टींची वानवा आहे .दरम्यान या परिसरापासून कित्येक किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. अशी माहिती उपलब्ध झाली आहे

.या रांगा नंतर मोकळ्या होई तोवर पोलीस प्रशासनाला प्रचंड परिश्रम घ्यावे लागले. बेळगाव हुन गोव्याकडे जाणाऱ्या अनेक वाहनांनी परत फिरून दोडा मार्गे जाण्याचे पसंत केले होते?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.