रायण्णा पुतळा विटंबना : तिघे पोलिसांच्या ताब्यात-शहरातील अनगोळ येथील क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा यांचा पुतळा विटंबना प्रकरणी पोलिसांनी तिघा जणांना अटक केली आहे.
बेंगलोर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अवमान करण्यात आल्यानंतर शहरातील अनगोळ येथील कनकदास काॅलनी येथे असलेल्या क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा यांच्या पुतळ्याची कांही समाजकंटकांनी विटंबना केली होती.
याप्रकरणी सीसीटीव्ही फुटेज वरून पोलिसांनी तिघा जणांना अटक केली आहे. दरम्यान पुनर्स्थापित करण्यात आलेल्या क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा यांच्या पुतळ्याचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज कनकदास कॉलनी येथे दर्शन घेऊन अभिवादन केले.