बेळगाव शहरातील प्रसिद्ध असलेल्या पांगुळ गल्ली येथील अश्वत्थामा मंदिरात चोरीची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली आहे.या घटनेमुळे बेळगाव शहरातील मंदिरातून खळबळ माजली असून चोरट्याकडून चोरीसाठी मंदिरे लक्ष केलो जात असल्याचे उघडकीस आले आहे.
घटना स्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार अश्वत्थामा मंदिरातील श्री अश्वत्थामा मूर्तीचा चांदीचा किरीट लंपास करण्यात आला आहे त्याची आताची अंदाजे किंमत चार लाख रुपये असावी ज्यावेळी आम्ही तो बनवला होता त्यावेळी त्याला 35 हजार खर्च आला होताअशी माहिती गल्लीतील एका जेष्ठ पंचाने बेळगाव live शी बोलताना दिली.
मंगळवारी पहाटेच्या दरम्यान अज्ञातांनी मंदिरात प्रवेश केला व चांदीचे किरीट लंपास केले घटनेची माहिती कळताच गल्लीतील नागरिकांनी आणि भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पोलीस तपास सुरू करणार आहेत.
प्रत्यक्षदर्शीनी सांगितलेल्या माहिती अनुसार चोरांनी दुसऱ्या कोणत्या तरी मंदिरात चोरी केली असावी त्या मंदिरातील देवीचे कपडे बाजूच्या कॉम्प्लेक्स मध्ये फेकण्यात आले आहेत.
बेळगाव शहरांमध्ये गेल्या काही दिवसापासून मंदिराना टार्गेट केले जात असून शहरातील मंदिरातील दागिने चोरी करण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे गेल्या महिन्याभरात पूर्वीपासून ग्रामीण भागात या घटना अधिक होत्या तर त्यानंतर काल सोमवारपासून शहरांमध्ये या घटना वाढू लागल्या आहेत.
कालच ओल्ड गांधी नगर येथील एका बस्ती मध्ये चोरट्यांनी डल्ला मारत सहा लाख रुपयांचे दागिने लांबवले होते आज मंगळवारी सकाळी बेळगाव शहरातील पांगुळ गल्ली येथील एक प्राचीन काळापासून असलेल्या प्रसिद्ध अश्वत्थामा मंदिर मध्ये देखील चोरी केली आहे