Friday, January 3, 2025

/

बेळगाव जवळ तब्बल सुमारे 10 फुटी किंग कोब्रा जेरबंद!

 belgaum

जगातील सर्वात बुद्धिमान, सर्वात लांब आणि जहाल विषारी मानला जाणारा सुमारे 10 फूट लांबीचा किंग कोब्रा अर्थात राज नाग धामणे एस. येथील धरणाच्या दरवाजे खेचणाऱ्या 25 फूट उंचीवरील मशीनमध्ये आढळून आला असून सर्पमित्र आनंद चिट्टी यांनी मोठ्या धाडसाने या सापाला पकडून त्याला वन खात्याच्या मदतीने नैसर्गिक अधिवासात सोडले आहे.

बेळगाव तालुक्यातील धामणे एस. गावानजीक असलेल्या धरणाचे दरवाजे खेचण्याच्या 25 फूट उंचीवर असलेल्या मशीनमध्ये गेल्या दोन दिवसापासून किंग कोब्रा जातीचा राजनाग साप ठाण मांडून बसला होता. सलग दोन दिवस हा सर्प निदर्शनास आल्यामुळे वनरक्षक राहुल बोंगाळे यांनी ही बाब आपले वरिष्ठ अधिकारी रमेश यांच्या कानावर घातली. त्यानंतर 25 फूट उंचीवर असलेल्या धरणाच्या दरवाजांच्या मशीनमध्ये ठाण मांडलेल्या त्या नाग सापाला त्या अवघड जागेतून सुरक्षित बाहेर काढण्यासाठी सर्पमित्र आनंद चिट्टी यांना पाचारण करण्यात आले. तेंव्हा चिठ्ठी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

ज्या ठिकाणी मशीनमध्ये तो साप वास्तव्य करून होता त्या ठिकाणी थांबण्यासाठीही जागा नसल्यामुळे साप पकडणे जिकरीचे आणि अत्यंत धोकादायक होते. तथापि आनंद चिट्ठी आणि धोका पत्करून महत्प्रयासाने त्या सुमारे 10 फूट लांबीच्या किंग कोब्रा सापाला शिताफीने ताब्यात घेतले. Chitti

चिठ्ठी यांनी पकडलेला किंग कोब्रा अर्थात राजनाग 9 फूट 8 इंच लांबीचा असून जवळपास 8 किलो वजनाचा होता. हा साप नर जातीचा असून या परिसरात पहिल्यांदाच आढळून आल्याचे सर्पमित्र चिट्टी यांनी सांगितले. साप पकडल्यानंतर आनंद चिट्ठी यांनी त्याला वनविभागाच्या सहकार्याने तात्काळ सुरक्षित नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.

भारतीय राजनाग हा अतिशय विषारी सर्प असून याच्या विषावर थायलंडमध्ये औषध उपलब्ध आहे. हा सर्प सुमारे 18 फुटापर्यंत वाढू शकतो. तसेच 20 ते 25 अंडी घालतो. या सर्पचे मुख्य खाद्य सर्पच असून हा सर्पामध्ये सर्वात बुध्दीमान समाजला जातो. कारण हा अंडी घालताना पालापाचोळ्या पासून घरटे तयार करतो. पश्चिम घाट परिसर, तामिळनाडू, केरळ व पश्चिम बंगालमध्ये हा सर्प आढळतो. घनदाट जंगलात, बांबूच्या वनात, नदी शेजारी हा सर्प वास्तव्य करतो.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.