Tuesday, November 19, 2024

/

सुंठकर आणि सहकाऱ्याना अटक व सुटका

 belgaum

बेंगलोर येथे घडलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा विटंबनेच्या निषेधार्थ तसेच शहरातील छ. शिवाजी उद्यानातील शिवरायांच्या पुतळ्याला अभिषेक घालून पूजा करण्यास मज्जाव केल्यामुळे रस्त्यावर ठाण मांडून निदर्शने करणारे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर आणि समिती नेते माजी महापौर शिवाजी सुंठकर यांच्यासह अन्य आंदोलकांना आज सकाळी पोलिसांनी अटक केली व समज देऊन सुटका केली.

बेंगलोर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा विटंबना घटनेची तीव्र पडसाद बेळगाव सीमाभागात उमटली असून काल रात्रीपासून बेळगाव शहरात विविध हिंदुत्ववादी संघटनांतर्फे तीव्र निषेध नोंदविला जात आहे. या पार्श्‍वभूमीवर शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते माजी महापौर शिवाजी सुंठकर हे शिवसेनेच्या अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत आज सकाळी शहापूर छत्रपती शिवाजी उद्यान येथील शिवरायांच्या पुतळ्याची पूजा करण्यास दिले होते. त्यावेळी उद्यानाच्या प्रवेशद्वारावरच पोलिसांनी त्यांना अडवून उद्यानात जाण्यास मज्जाव केला. यावेळी आम्ही फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पूजा करून माघारी जाणार आहोत तेव्हा कृपया आम्हाला तशी मुभा द्यावी अशी विनंती प्रकाश शिरोळकर आणि शिवाजी सुंठकर यांनी पोलिस अधिकाऱ्यांना केली. तथापि पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना अटकाव केला. तसेच शहरात 144 कलमान्वये जमावबंदीचा आदेश आहे तेव्हा कृपया प्रवेशद्वारासमोर गर्दी करू नका असे सांगून पोलिसांनी शिरोळकर सुंठकर आणि अन्य सर्वांना उद्यानाच्या प्रवेशद्वारापासून दूर रस्त्याच्या एका बाजूला हटविले.Sunthkar

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना शिवाजी सुंठकर आणि प्रकाश शिरोळकर यांनी बेंगलोर येथे घडलेल्या घटनेचा निषेध करून छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्या गोष्टी कर्नाटकात सुरू आहेत. हे सीमाभागातील समस्त मराठी बांधव आणि हिंदू कधीही खपून घेणार नाही शिवरायांच्या पुतळ्याची पूजा करण्यास विरोध करून आमची डवणूक करणार्‍या पोलिस प्रशासनाचा आम्ही जाहीर धिक्कार करतो असे सांगितले. पोलिसांनी जबरदस्तीने उद्यानाच्या प्रवेशद्वारापासून दूर हटवल्यानंतर त्या ठिकाणी प्रकाश शिरोळकर आणि शिवाजी सुंठकर यांच्या नेतृत्वाखाली उपस्थित शिवसैनिक आणि समिती कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच ठिय्या आंदोलन छेडले.

यावेळी बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्यांचा धिक्कार असो! आदी घोषणा देण्यात येत होत्या. या प्रकारामुळे परिस्थिती अधिक चिघळून हाताबाहेर जाऊ नये यासाठी पोलिसांनी त्वरित शिवसेना जिल्हा प्रमुख प्रकाश शिरोळकर समिती नेते शिवाजी सुंठकर यांच्यासह आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन पोलीस व्हॅनमध्ये घातले. अटक होत असताना देखील पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिवरायांचा जयजयकार करत होते. नंतर पोलीस स्थानकात हजर करून त्यांची सुटका कऱण्यात आली

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.