भाजप सरकारला धर्मांतरविरोधी विधेयक मंजूर करू देणार नाही: काँग्रेस नेते सिद्धरामय्या- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या यांनी कर्नाटकातील सत्ताधारी भाजप आपला ‘छुपा अजेंडा’ राबविण्याच्या उद्देशाने ‘लव्ह जिहाद, धर्मांतर विरोधी’ यासारखे भावनिक विषय आणून जनतेचे लक्ष वास्तविक मुद्द्यांपासून वळविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला.मात्र आम्ही हे विधेयक भाजपला मंजूर करू देणार नाही असे त्यांनी सांगितले.
2023 च्या विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस सत्तेवर येण्याचा विश्वास व्यक्त करताना, ते असेही म्हणाले की त्यांचा पक्ष धर्मांतर विरोधी विधेयक मंजूर करू देणार नाही. सरकार चालू हिवाळी अधिवेशनात ते विधेयक मांडण्याची योजना आखत आहे.
“आम्ही शंभर टक्के २०२३ च्या विधानसभा निवडणुकीनंतर सत्तेत परत येऊ. स्थानिक प्राधिकरण मतदारसंघातून एमएलसी निवडणुकीदरम्यान आम्हाला एकूण ९४,००० मतांपैकी ४४,००० मते मिळाली, तर भाजपला सुमारे ३७,०००, जेडीएसला १०,००० मते मिळाली,”असे सिद्धरामय्या म्हणाले.
काँग्रेस सत्तेत यावी, अशी जनतेची इच्छा असल्याचे यावरून दिसून येते. वास्तविक मुद्द्यांवरून लोकांचे लक्ष वळवण्यासाठी सरकार धर्मांतरविरोधी कायदा आणण्याचे प्रयत्न करत असल्याचा आरोप करून सिद्धरामय्या म्हणाले, “त्याची गरज आहे का? गरज नाही. जबरदस्तीने धर्मांतर होत असेल तर, संबंधितांविरुद्ध तक्रार करा आणि त्यांना शिक्षा करा. यासाठी आधीच कायदा आहे.”
होसदुर्गाचे भाजप आमदार गुलीहट्टी शेखर यांच्या दाव्याकडे लक्ष वेधून बळजबरीने किंवा प्रलोभनेद्वारे धर्मांतरण सर्रास झाले आहे आणि त्यांची स्वतःची आई अशा कृत्याची बळी आहे, “त्यांनी किंवा त्यांच्या आईने तक्रार केली होती का?”या विरुद्ध तक्रार केली होती का? असा सवाल त्यांनी केला.