कर्नाटक सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर, जुलैमध्ये लागू होणार 7 वा वेतन- राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सी एस षडाक्षरी यांनी जुलै 2022 मध्ये सातवा वेतन आयोग स्थापन होणे अपेक्षित आहे.अशी माहिती दिली आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन किमान 10,000 रुपयांवरून 45,000 रुपये केले जाण्याची शक्यता आहे.असे त्यांनी सांगितले.
पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, राज्य सरकार येत्या वर्षी फेब्रुवारीमध्ये अर्थसंकल्पात सातवा वेतन आयोग स्थापन करण्याची घोषणा करेल. त्याचा फायदा सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना होणार आहे.
राज्यातील सर्व आमदार आणि खासदारांना निवेदन देऊन शिक्षकांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी तसेच विविध विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी शासनाकडे आग्रह धरणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सातवा वेतन आयोग लवकर सुरू क्रा या मागणीसाठी वारंवार आंदोलने करण्यात आली असून त्याला यश मिळत आहे.