कनिष्ठांसाठी ‘येथे’ होणार राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धा-इंडियन बॉडी बिल्डर फेडरेशनतर्फे येत्या फेब्रुवारी महिन्यात 12 व्या कनिष्ठ पुरुष, वयस्क आणि दिव्यांगांसाठी शरीर सौष्ठव स्पर्धा
तसेच महिलांसाठी तिसऱ्या ज्युनियर वुमन्स स्पोर्ट्स मॉडेल फिजिक / लेडीज वुमन्स स्पोर्ट्स मॉडेल फिजिक राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा -2022 चे आयोजन करण्यात आले आहे.
पांडेचेरी बॉडी बिल्डर्स अँड फिटनेस असोसिएशनचे अध्यक्ष के गणेश आणि सरचिटणीस एम. मुगुंदन यांच्या नेतृत्वाखाली येत्या 22 आणि 23 फेब्रुवारी 2022 रोजी उपरोक्त राष्ट्रीय
स्तरावरील शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. सदर स्पर्धेसंदर्भातील तपशीलवार माहितीचे परिपत्रक लवकरच जाहीर केले जाईल, असे आयोजकांतर्फे कळविण्यात आले आहे.