शुक्रवारी झालेल्या घटनांच्या पाश्वभूमीवर बेळगाव शहरात जमाव बंदीचा आदेश पोलीस आयुक्त त्यागराजन यांनी बजावला आहे.
शनिवारी सकाळी 8 ते रविवारी सायंकाळी 6 वाजे पर्यंत बेळगाव शहरात 144 कलम जमाव बंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे.
बंगळुरूत छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्तीची विटंबना झाल्याने बेळगाव शहर तालुका आणि महाराष्ट्रात देखील याचे पडसाद उमटले आहेत त्या पाश्वभूमीवर अनेक शिव भक्तांकडून शनिवारी सकाळी 10 वाजता मोर्चा काढला जाणार होता शुक्रवारी रात्री जोरदार निदर्शन झाली होती
दगडफेक लाठी हल्ला सारख्या घटना घडल्या होत्या या व्यतिरिक्त अनेक वाहनांवर दगडफेक झाली होती त्यामुळे शहरातील वातावरण बिगडू नये यासाठी पोलीस आयुक्त त्यागराजन यांनी 144 कलम जारी करण्याचा आदेश दिला आहे.
शनिवारी आणि रविवार हे दोन दिवस अधिवेशनला सुट्टी आहे त्यामुळे 144 कलम जारी झाल्याने आता चार हून अधिक लोकांना एकत्रित येता येणार नाही.
दरम्यान बेळगाव शहरातील समिती नेते शिवभक्त हिंदुत्ववादी कार्यकर्ते आणि अनेकाना पोलिसांनी ताब्यात घेऊन ए पी एम सी पोलीस स्थानकात स्थानबद्ध केलं आहे.