Friday, January 3, 2025

/

महामेळावा होणारचं पोलिसांना ठणकावून सांगितलं

 belgaum

65 वर्षाच्या निरंतर लढ्याची पुढची पायरी म्हणजे महामेळावा, संघर्ष आणि लोकेच्छेतून उभा राहिलेले हे आंदोलन मराठी अस्मितेचे केंद्रबिंदू आहे.मराठीची ज्योत मराठी माणसाच्या हृदयात तेवत असते.

डोक्यात भगवा विचार घेऊन प्रत्येक मराठी माणूस महा मेळाव्याला येतो ते कुणाशी वैर धरून नाही, तर आपल्याला मराठीला जिंकवायच हे शौर्य त्याचा मनात असते . आजवर मराठी माणसाचे दमन करण्यासाठी पोलिसांनी अनेक वेळा क्रौर्य दाखवलं, तरीही मराठी माणूस हटला नाही तर परत परत पेटत राहिला., आणि आंदोलने अधिकाधिक तीव्र होत गेली.जर बेळगावला अधिवेशन होणार असेल तर महामेळावा हा होणारच ही मराठी माणसांची आग्रही भूमिका आहे. ज्या लोकप्रतिधिनीनी मराठी मताचा जोगवा मागितला आणि मराठी मतांवर खुर्च्या मिळवल्या त्यांनी मराठी माणसासाठी काय केलंय हे ही आता दाखवून देण्याची गरज आहे. मराठी जनतेवर अत्त्याचार झाला तर या लोकप्रतिनिधींना मराठी माणसाची किती जाण आहे हे दिसून येईल.

पोलीस प्रशासन मेळाव्याला आडकाठी घालत आहे,पण त्यांनाही विरोधाचं नेमकं कारण सांगता नाही.लोकशाही विरोधी कृत्य पोलिस खातेही करू शकणार नाही.मध्यवर्ती समिती अध्यक्ष दळवी यांनी निसंदिग्धपणे आपले म्हणणे पोलीसासमोर मांडले आणि भव्य मेळावा होणारच याची पुन्हा एकदा डरकाळी फोडली.खडे बाजार ए सी पी चंद्रप्पा यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी समिती नेत्यांसोबत बैठक केली

दिपक दळवी यांनी पोलिसांना ठणकावून सांगितल की महाराष्ट्र एकीकरण समिती मराठी भाषिक लोकशाही मार्गाने आंदोलन करत आलेत अधिवेशनालाही लोकशाही मार्गानेच विरोध करणार आहेत.Police mes leaders meeting

कोविड नियमावलीचे पालन करून महा मेळावा घेणार आहोत मास्क सॅनी टायझर,सामाजिक अंतर गर्दी न करणे, शासकीय मार्गदर्शक सुचीनुसार आंदोलन करणार आहोत.वेगवेगळ्या गटाने वॅक्सिंन डेपो मध्ये एकत्र जमणार आहोत.नियमानुसार आम्हाला परवानगी ध्या हजारो लोक सहभागी होतील मैदानासाठी रीतसर अर्ज केला आहे त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत महामेळावा होणारचं अशी भूमिका मध्यवर्ती नेत्यांनी घेतली आहे.

काही पोलीस अधिकाऱ्यांनी समिती कार्यकर्ते भगवे ध्वज घेऊन मेळाव्यात सहभागी होत असतात यावर आक्षेप घेताच दळवी यांनी भगवा ध्वज घेत शांततेने आंदोलन करणे गुन्हा आहे का? असा प्रति प्रश्न केला त्यावर त्या पोलिस निरीक्षकांची बोलती बंद झाली. मेळाव्यात सहभागी होणाऱ्याना अडवू नये अशी ऊबंटी केली महाराष्ट्रातील नेत्यांना आमंत्रण देण्यात आलं आहे असेही समिती नेत्यांनी सांगितलं

दरम्यान उद्या शुक्रवारी सकाळी 10:30 वाजता समितीनिष्ठ कार्यकर्त्यांनी महा मेळाव्याच्या नियोजनासाठी डेपो मैदानावर यावे असे आवाहन समिती नेत्यांनी केलं आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.