बेळगाव जाधव नगर येथील एनसीसी मुख्यालयाच्या समोर एक विद्युत खांबाला जोडलेली विद्युतभारित वायर तुटून पडली होती. हा प्रकार लक्षात येताच कॅम्प पोलीस स्थानकाचे अधिकारी विनोद महालमनी यांनी लागलीच हेस्कोम अधिकाऱ्यांना याची कल्पना दिली. हेस्कॉमने तातडीने दाखल होत त्या तुटलेल्या वायरचा भाग पुन्हा जोडला असून अनर्थ टाळला गेला आहे.
एक जर्मन शेफर्ड श्वान नुकतेच विद्युतभारित तार लागल्यामुळे मृत्यूमुखी पडल्याची घटना शहरात घडली .त्यामुळे अशा प्रकारच्या वायरचा गंभीर धोका निर्माण झाला होता .त्यामुळे खबरदारी म्हणून विनोद महालमनी यांनी दाखवलेल्या कार्यतत्पर तेचे सध्या कौतुक होत आहे .
परिसरातील नागरिकांनी बेळगाव पोलिस आयुक्तांचेही आभार मानले असून असे कर्तव्यदक्ष अधिकारी पोलीस दलात असल्याबद्दल कौतुक केले आहे.
याप्रकारे तुटलेल्या वायरकडे लक्ष देणारी यंत्रणा कायम कार्यरत ठेवावी त्यामुळे त्यातून विद्युत प्रभार कोणालाही लागून नसता अनर्थ घडला जाणार नाही याकडे लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.