रहदारीला अडथळा करणाऱ्या भाजी व फळ विक्रेत्यांना कंग्राळी ग्रा पं व पोलीस विभागाने सक्त ताकीत देत अडथळा न करता फुटपाथ सोडूनच विक्री करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
कंग्राळी खुर्द – या गावच्या मुख्य रस्त्यालगत भाजी व फळ विक्री करणाऱ्या व्यापारांना ग्राम पंचायत व पोलीस विभागाच्या वतीने रहदारीला अडथळा न करता फुटपाथ सोडूनच आपली भाजी व फळ विक्री करण्यांबाबत सक्त ताकीद दिली असून सूचनांचे पालन न करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
वाहतुकीची कोंडीची समस्या
या गावच्या मुख्य रस्त्याचे रंदीकरण झाले असले तरी वाहतुक वाढल्याने सतत कोंडी होत आहे एपीएमसी पासून गावच्या प्रवेश द्वारा पर्यंत रस्त्या कडेला तयार केलेल्या फुटपाथवर भाजी फळे व अन्य वस्तू विक्रेत्यांनी दुकाने मांडली आहेत त्याला लागून दूचाकी चारचाकी यांचे पार्किंग केले जात आहे त्यामुळे रहदारी साठी अतिशय अरुंद रस्ता राहत असून सतत वाहतुकीची कोडी होत आहे . छोट्या छोट्या अपघाताचे प्रमाणही वाढले आहे . याबाबत अनेकांनी ग्रा.प च्या निदर्शनाला ही बाब आणली होती त्यानुसार ग्रा.प . अध्यक्ष यल्लापा पाटील सदस्य चेतक कांबळे , कल्लापा पाटील , वैजनाथ बेन्नाळकर , प्रशांत पाटील , राकेश पाटील, महेश धामणेकर , श्री माळगी , महिला पो. अधिकारी के.एस नाईक, ए एस आय आर एन कलादगी , कॉन्टेबल मनोहर आदीनी वस्तुस्थितीची पाहणी करून सर्वाना सक्त ताकीत दिली .ग्राम पंचायत आणि पोलिस विभागाच्या कारवाईमुळे नागरिकातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
मसनाई यात्रेला सहकार्य करा
कंग्राळी खुर्द ग्राम पंचायत सदस्यांनी रहदारी पोलीस उपायुक्त पी जी स्नेहा यांची भेट घेऊन आगामी 22 व 23 तारखेला ग्रामदैवत मसणाई यात्रे निमित्त पोलीस विभागाकडून आवश्यक सहकार्य करा अशी मागणी केली. कोरोना नियम पाळून यात्रा साजरी होणार असली तरी गरजेनुसार जादा कुमक देण्याची मागणीही केली त्यावर पोलीस उपायुक्त स्नेहा यांनी एपीएमसी पोलीसाना योग्य सहकार्य करून परिस्थिती वर लक्ष ठेवण्योबाबत सूचना केल्या.