राज्यातील ओमिक्राॅन व्हेरीएंटचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन नववर्षाचे स्वागत गर्दी न करता साधेपणाने करावे, अशी शिफारस राज्याच्या कोरोना तांत्रिक सल्लागार समितीने (टीपीसी) केली आहे.
तज्ञांच्या पॅनेलने नववर्ष स्वागताच्या लहानमोठ्या सर्वच कार्यक्रमांवर बंदी घालण्याची शिफारस केली आहे. राज्यातील पब, बार, रेस्टॉरंट आणि क्लब्समध्ये दैनंदिन व्यवहारासह ग्राहकांची सेवा सुरू ठेवावी. मात्र नववर्षाच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाऊ नये. मॉल्स किंवा रस्त्यावर आणि सार्वजनिक ठिकाणी सामूहिक नववर्ष साजरे करण्यास परवानगी दिली जाऊ नये, असे तज्ज्ञांनी म्हंटले आहे.
विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी त्यादिवशी 144 कलमान्वये जमावबंदीचा आदेश तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिनियम आणि महामारी रोग अधिनियम लागू करावा, असा सल्लाही तज्ञांनी दिला आहे.
दरम्यान, बेंगलोर आणि संबंधित अन्य शहरांमध्ये 30 डिसेंबर 2021 ते 2 जानेवारी 2022 पर्यंत दररोज सायंकाळी 7 ते पहाटे 5 वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू लागू करण्यात आल्याचे वृत्त आहे. राज्यातील मंदिर, चर्च, मशिदी आदी प्रार्थना स्थळांच्या ठिकाणी 22 डिसेंबरपासून येत्या 2 जानेवारी 2022 पर्यंत 50 टक्के उपस्थिती असावी आणि पुजारी अथवा धर्म गुरुंकडे सर्वांची आरटी -पीसीआर निगेटीव्ह प्रमाणपत्र असली पाहिजेत.
सार्वजनीक आनंदोत्सवमुळे कोरोनाचा उद्रेक होण्याची शक्यता असल्यामुळे नववर्ष सार्वजनिक ठिकाणी साजरे न करता घरांमध्ये करावे, अशी शिफारस राज्याच्या कोरोना तांत्रिक सल्लागार समितीने केली आहे.