खानापूर तालुक्यातील सोन्यानट्टी (भोरूनकी) येथील तलावात बुडून मृत्युमुखी पडलेल्या एका युवकाच्या असहाय्य कुटुंबाला भाजप नेत्या डॉ. सोनाली सरनोबत यांनी आपल्या नियती फाउंडेशनच्या माध्यमातून 5 हजार रुपयांची आर्थिक मदत देऊ केली.
सोन्यानट्टी (ता. खानापूर) गावातील जानू विठ्ठल जांगळे (वय 27) या युवकाचा अलीकडेच तलावात बुडून मृत्यू झाला. जानू याच्या पश्चात आई-वडील आणि तीन लहान बहिणी असा परिवार आहे. जानुच्या दुर्दैवी मृत्यूमुळे या सर्वांवर दुःखाचा डोंगर कोसळून त्यांची परिस्थिती असहाय्य बनली होती.
याबाबतची माहिती मिळताच बेळगावच्या भाजप नेत्या डाॅ. सोनाली सरनोबत यांनी स्थानिक नेत्यांसमवेत सोन्यानट्टी येथे जाऊन जांगळे कुटुंबाची प्रत्यक्ष भेट घेतली.
तसेच त्यांचे सांत्वन करण्याबरोबरच आपल्या नियती फाउंडेशनच्यावतीने त्यांना 5 हजार रुपयांची आर्थिक मदत देऊ केली.
याप्रसंगी बसवराज कडेमनी, ईश्वर सानिकोप्प, बाळेश चावन्नावर, कुशल अंबोजी, नागेश रामजी, प्रवीण पाटील, अरुण परसन्नावर, संतोष कुरबर, कुमार चावन्नावर, महेश गुरव, रुद्राप्पा भेंडीगिरी, संदीप तिप्पनावर आदी उपस्थित होते.