व्हॅक्सीन डेपो मैदानावर आयोजित केलेल्या सीमावासियांच्या मेळाव्यात महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्या अंगावरकाळा रंग फेकण्याच्या कृतीचा निषेध व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बेळगाव, खानापूर, बेळगाव तालुका,निपाणी घटक समित्यांनी बंदचा आदेश दिला होता.
या भागातील मराठी भाषिकांनी बंद शांततेत पार पाडून मराठी अस्मितेचे दर्शन घडविले याबद्दल मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने आभार मानण्यात आले आहेत.
कमी काळात बंद जाहीर झाला तरी नागरिकांनी आपले व्यवहार बंद ठेवून समितीचे अध्यक्ष आणि वर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला कर्नाटकच्या विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू असतानाही झालेला बंद ऐतिहासिक ठरला असून याबद्दल आभार मानण्यात आले आहेत