Tuesday, January 28, 2025

/

मंच हटवण्याचा प्रयत्न : दळवींवर भ्याड हल्ला!

 belgaum

कर्नाटक विधिमंडळाच्या निषेधार्थ व्हॅक्सिन डेपो मैदानावर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे आयोजित महामेळाव्यासाठी उभारण्यात आलेला मंच दडपशाही करून काढून टाकण्याचा मनपा अधिकारी व पोलिसांच्या प्रयत्नला तीव्र विरोध करून समितीने त्यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी आज सकाळी मंचावरच ठिय्या आंदोलन छेडले. मात्र यावेळी पोलिसांसमक्ष करवे कार्यकर्त्यांनी भ्याड हल्ला करून समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्या अंगावर शाल टाकून तोंडाला काळे फासण्याचा संतापजनक प्रकार झाल्याने सध्या व्हॅक्सिन डेपो मैदानावरील वातावरण तापले आहे. समिती कार्यकर्त्यांनी झाल्या प्रकारचा तीव्र निषेध करून जोरदार घोषणाबाजी करून सरकार व प्रशासनाचा धिक्कार केला.

मराठी भाषिकांना डिवचण्यासाठी कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशनाला आज सोमवारपासून बेळगाव सुवर्ण विधानसौध येथे प्रारंभ होत आहे. मराठी भाषिकांना डिवचण्याचा साठी अधिवेशन भरविले जात असून याला आपला विरोध दर्शवण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली टिळकवाडीतील व्हॅक्सिन डेपो येथे महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. कोणत्याही परिस्थितीत हा महामेळावा यशस्वी करण्यासाठी कंबर कसलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीने काम मध्यरात्री 1:30 वाजताच मेळाव्यासाठी मंच उभारला आहे. आज सकाळी मनपा अधिकाऱ्यांनी मैदान महापालिकेच्या मालकीची असल्यामुळे परवानगीशिवाय या ठिकाणी मंच उभारता येणार नाही असे सांगून तो हटविण्याचा प्रयत्न केला मात्र समितीच्या नेतेमंडळींनी त्याला तीव्र विरोध केला. माजी महापौर शिवाजी सुंठकर यांनी प्रथम व्हॅक्सीन डेपो मैदान महापालिकेच्या मालकीचे आहे त्याची कागदपत्रे दाखवा मग आम्ही मंच हटवायचा की नाही ते ठरवू असे अधिकाऱ्यांना ठणकावून सांगितले.

यावेळी व्यासपीठावर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर यांच्यासह अन्य नेते आणि कार्यकर्ते मंचाच्या ठिकाणी उपस्थित होते. मनपा अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने मनचा हटवण्याच्या हालचाली सुरू करताच नेतेमंडळी आणि कार्यकर्त्यांनी मंचावर ठिय्या आंदोलन छेडले. यावेळी मनपा अधिकारी लक्ष्मी निप्पाणीकर आणि समिती नेतेमंडळी मध्ये जोरदार शाब्दिक खडाजंगी उडाली. समितीच्या कांही कार्यकर्त्यांनी प्रथम गेल्या जवळपास वर्षभरापासून महापालिकेसमोर बेकायदा फडकणारा लाल पिवळा झेंडा काढा मग आम्हाला मंच हटवण्यास सांगा, असे निप्पाणीकर यांना सुनावले.

 belgaum

यापद्धतीने लोकशाहीची पायमल्ली करून दडपशाहीने महामेळावा उधळून लावण्यासाठी मंच हटवण्याचा प्रयत्न सुरू असतानाच त्या ठिकाणी चोरट्याप्रमाणे आलेल्या कांही करवे कार्यकर्त्यांनी मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर शाई फेकून त्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा प्रयत्न केला. महामेळाव्याचा मंच हटवण्याचा प्रयत्न होत असतानाच पोलिसांसमक्ष हा प्रकार घडल्यामुळे उपस्थित समिती कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली.

संतप्त कार्यकर्त्यांनी दळवी यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा निषेध करून जोरदार घोषणाबाजी सुरू केली आणि वातावरण तापले. तथापि समिती नेत्यांनी महामेळावा उधळण्याचा हा डाव असल्यामुळे कार्यकर्त्यांनी संयम पाळून मेळावा यशस्वी करावा असे आवाहन केले. शेकडोंच्या संख्येने व्हॅक्सिन डेपो मैदान येथे पोलिस बंदोबस्त ठेवला असताना करवे कार्यकर्त्यांकडून भ्याड कृत्य झाल्यामुळे नागरिकांकडून पोलीस प्रशासनाचा धिक्कार केला जात आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.