भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्याबाबत आपण आमदार रमेश जारकीहोळी आणि केएमएफ अध्यक्ष आमदार भालचंद्र जारकीहोळी यांच्याशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याची माहिती आमदार लखन जारकीहोळी यांनी दिली.
बेळगाव येथे ते पत्रकारांशी बोलत होते. भाजप उमेदवाराच्या पराभवाला आमदार रमेश जारकीहोळी कारणीभूत असल्याचे काँग्रेस नेते डी. के. शिवकुमार यांनी म्हंटले आहे.
त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना बेंगलोरमध्ये केजीएफ बाबू आणि हासनमध्ये एम. मंजु यांच्या मुलांच्या पराभवाला कारणीभूत असलेल्यांवर कोणती कारवाई केली जाणार? हे आधी स्पष्ट करण्यात यावे.
जिल्ह्यात भाजपचे 13 आमदार आणि 2 खासदार आहेत, असे असताना केवळ आमदार रमेश जारकीहोळी यांच्यावरच का आरोप केला जात आहे? असा सवालही आमदार लखन जारकीहोळी यांनी केला. दरम्यान, आमदार लखन जारकीहोळी हे अपक्ष म्हणून कर्नाटक विधान परिषदेवर निवडून गेले आहेत. त्यामुळे त्यांची पुढील राजकीय चाल काय असणार? याबाबत सध्या तर्कवितर्क लढविले जात आहेत.