मागील वेळी विधानपरिषदेत प्रथम प्राधान्याने निवडून आलेल्या भाजपचे उमेदवार महांतेश कवटगीमठ यांना यावेळी हार पत्करावी लागली. भाजपने यावेळी प्रथम प्राधान्याने आपला उमेदवार निवडून येईल असे जाहीर केले होते. मात्र त्यांचा भ्रमनिरास झाला आहे तर काँग्रेस पाठोपाठ दुसऱ्या प्राधान्याने अपक्ष उमेदवार लखन जारकीहोळी निवडून आले.
निवडून येताच त्यांनी भाजपच्या कवटगीमठला काँग्रेसनेच फसविले असल्याचे सांगून आणखी एक गुगली टाकली आहे.
निवडणुकीत विजयी झाल्यानंतर पत्रकारांनी त्यांना अनेक प्रश्न विचारले. भाजपच्या पराभवात तुमचा व बंधूंचा हात आहे का ?असा प्रश्न विचारला तर आता भाजपचे काही लोक असा आरोप करत आहेत. मात्र माझ्या बंधूंनी पूर्ण प्रामाणिकपणे भाजपचाच प्रचार केला आहे. त्यांचे नुकसान काँग्रेसनेच केले आहे. यात कवटगीमठ यांना अती आत्मविश्वास नडला.त्यांनी काँग्रेसशी सेटिंग केली होती.
आम्ही दोघे मिळून निवडून येऊन अशा प्रकारची सेटिंग होती. त्यांना ती महागात पडली आहे. आता आपल्या पराभवाला दुसरे कारणीभूत असल्याचे बोलून आपली जागा ते दाखवून देत असल्याचेही लखन म्हणाले. अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीत उभा राहत असताना मतदारांचा आपल्याला कौल मिळणार याची पूर्णपणे खात्री होती.
मतदारांनी आपल्याला विजयी करून हे सिद्ध करून दिले आहे . भाजपने मात्र काँग्रेसचे डीके शिवकुमार यांच्याशी सेटिंग करून आपले नुकसान करून घेतले आहे असे ते म्हणाले.