गोवा राज्यातून महाराष्ट्रात विनापरवाना दारूची वाहतूक करणाऱ्यावर अबकारी खात्याच्या पथकाने धाड टाकून मुद्देमालासह 7,75,193 रुपये किमतीचा दारूचा साठा जप्त केला. कणकुंबी येथे आज शुक्रवारी दुपारी झालेल्या या कारवाईत एकाला अटक झाली आहे.
दत्तात्रय हनुमंत खानापुरे (रा.वड्डर छावणी, खासबाग -बेळगाव) असे अटक केलेल्या वाहन चालकाचे नांव आहे. हा आयशर कंपनीच्या वाहनातून (क्र केए 22 डी 5685) गोव्याहून महाराष्ट्रात दारूची वाहतूक करताना अबकारी अधिकाऱ्यांनी कणकुंबी चेकपोस्ट येथे तपासणी केली असता या वाहनातून ट्रिपल एक्स रम, नॅशनल ओल्ड एस व्हिस्की आदी ब्रँड दारूच्या एकूण 180 बॉक्सची बेकायदा वाहतूक करण्यात येत होती.
या जप्त केलेल्या 1,557 लिटर दारूची किंमत एकूण किंमत 7,75,139 इतकी होते. अबकारी खात्याचे जिल्हा आयुक्त जयरामगौडा यांच्या नेतृत्वाखाली अबकारी खात्याची निरीक्षक चनगौडा पाटील, मंजुनाथ गलगली, उपनिरीक्षक चालुक्य, व त्यांच्या सहकाऱ्यानी ही कारवाई केली.