Friday, December 20, 2024

/

पोलिसांनी उधळला करवे चा मोर्चा

 belgaum

पिरनवाडी येथून अनगोळ कडे मोर्चा काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या कर्नाटक रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. मोर्चा काढण्याचा प्रयत्न उधळून लावण्यात आला असून त्यांची रवानगी बेळगाव शहराबाहेर केली जाणार आहे.

आज कर्नाटक रक्षण वेदिकेचे काही कार्यकर्ते पिरनवाडी च्या सीमारेषेत दाखल झाले. कनकदास सर्कल अनगोळ येथील संगोळी रायन्ना यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याचा निषेध करत कनकदास सर्कल पर्यंत मोर्चा काढण्याचा आपला मनोदय त्यांनी व्यक्त केला.

लदरम्यान पोलिसांनी मज्जाव केला. 144 कलम लागू असल्यामुळे कोणत्याही प्रकारचा मोर्चा काढण्याची परवानगी देता येत नाही. असे सांगूनही आम्ही मोर्चा काढणारच असा अट्टाहास धरल्यामुळे अखेर त्यांना अटक करून बस मधून शहराबाहेर घेऊन जाण्यात येत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

Piranwadi शहराबाहेर जाताना मात्र बस मधूनच आपल्या लाल पिवळयारंगाचे ध्वज आणि मफलर लहरवून घोषणा देण्याचा प्रयत्न हे कार्यकर्ते करत होते.

त्यामुळे पुन्हा एकदा शहराचे वातावरण बिघडण्याची शक्यता असून अशा प्रकारच्या कार्यकर्त्यांना शांततेच्या दृष्टीने बेळगाव शहरात प्रवेश दिला जाऊ नये अशी गरज व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.