बेंगलोर येथील काही समाजकंटकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केली आहे. त्याच्या निषेधार्थ खानापूर शहर आणि तालुका बंद ठेवण्याचा निर्णय हिंदुत्ववादी संघटनांनी घेतला आहे.
या बंदला महाराष्ट्र एकीकरण समिती भाजप शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान सर्व राजकीय पक्षांनी व संघटनांनी आपला पाठिंबा जाहीर केला आहे.
भाजप युवा नेते पंडित ओगले यांनी पुढाकार घेऊन तालुक्यातील सर्व हिंदू संघटना व राजकीय पक्षांचे नेते मंडळींशी संपर्क साधला. लक्ष्मी मंदिर येथे सभा आयोजित करण्यात आली होती .
यावेळी खानापूर बंदची हाक देण्यात आली. रविवारी संपूर्ण दिवस खानापूर तालुक्यातील सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळेच खानापूर शहरासह ग्रामीण भागात ही बंद पाळला जाणार आहे.
कर्नाटक सरकारने राष्ट्रपुरुषांचा आवमान करणाऱ्यांवर कठोरातील कठोर कारवाई करावी. अशी या बंद द्वारे मागणी केली जाणार असून समाजकंटकांचा निषेध केला जाणार आहे.