सध्या दिल्लीत संसदेचे हिवाळी अधिवेशन चालू आहे राज्यसभेत विविध प्रश्न खासदार हिरीहीरीने मांडत आहेत. शून्य प्रहर हा सभागृहात सदस्यांना लक्षवेधी सूचना मांडायची सुवर्ण संधी देतो यावेळी बहुतांश सदस्य या संधीचे चीज करतात बेळगावचे राज्यसभा सदस्य खासदार इराणणा यांनी मात्र ही नामी संधी दवडली.
राज्य सभेत झिरो हावर्स सकाळी 11 ते 12 तर लोकसभेत झिरो हावर्स 12 ते 1 या वेळेत असतो.राज्य सभेत शुक्रवारी सकाळी आकराच्या शून्य प्रहरात सदस्य इराणणा कडाडी यांना प्रश्न मांडण्याची संधी चालून आली होती.राज्य सभा अध्यक्ष उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू कडाडी यांचे नाव चार वेळा पुकारले मात्र ते प्रश्न उपस्थित करण्यासाठी सभागृहात उपस्थित नव्हते.
कर्नाटकात विजापूर येथे सैनिक स्कुल आहे ब्रिटिशां विरुद्ध लढलेले स्वातंत्र्य सेनानी वीर संगोळळी रायन्ना यांच्या स्मरणार्थ बेळगावात सैनिक स्कुल स्थापन केले जावे अशी मागणी कडाडी हे शून्य प्रहरात करणार होते मात्र त्यांच्या हलगर्जीपणामुळे संसदेत आवाज उठवण्याची संधी आता तरी गमावली आहे.
राज्यसभेत अश्या पद्धतीनं मिळणाऱ्या संधीचे जर खासदारांकडून दुर्लक्ष होत असेल किंवा त्यांच्या औदा शून्यतेचे लक्षण ठरत असेल तर ते ज्या भागाचे प्रतिनिधित्व करतात त्या भागाचा विकास खुंटतो.अगोदरच दक्षिण भारतातील आणि कर्नाटकातील खासदारांना संसदेत बोलायला कमी संधी मिळते असे अनेकदा आरोप झाले आहेत त्यातच मिळलेल्या संधीचा फायदा न उठवता आल्याने इराणणा कडाडी यांच्या बाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.
शून्य प्रहरात संधी मिळून देखील सभागृहात ते का उपस्थित नव्हते याची माहिती उपलब्ध नसली तरी बेळगावचा मुद्दा मांडायचा एक चान्स मात्र त्यांनी गमावलाय.
*राज्यसभा सदस्य इराणणा कडाडी यांनी गमावली संधी…*https://t.co/KCJicDTj0d pic.twitter.com/r7KnvfmgAR
— Belgaumlive (@belgaumlive) December 3, 2021