झिरो ट्राफिकमधून येऊन मंत्री झालेल्या शशिकला जोल्ले आणि खासदार अण्णासाहेब जोल्ले हे आपल्याच मतदार संघात ‘झीरो’ ठरले आहेत. मंत्री शशिकला जोल्ले यांच्या मतदार संघातील एकसंबा नगरपंचायत काँग्रेसने जिंकली आहे.
एकसंबा नगरपंचायतीच्या निवडणुकीत काँग्रेसचे माजी खासदार प्रकाश हुक्केरी व आमदार गणेश हुक्केरी यांच्याविरुद्ध भाजपच्या मंत्री शशिकला जोल्ले आणि खासदारांना अण्णासाहेब जोल्ले यांच्यात चुरस होती.
तिथे काँग्रेसने 17 पैकी 16 जागा पटकावत विजय मिळवत सत्ता आपल्याकडे घेतली आहे. भाजपला सत्ता गमावत केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले.
हुक्केरी व जोल्लेंमधील राजकारणाची चर्चा नेहमी अधोरेखित होते. त्याचा या निवडणुकीद्वारे पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे.