शांताई वृद्धाश्रमाच्या विद्या आधार अंतर्गत रद्दीतून बुद्धीकडे उपक्रमास जायंट्स मेनच्या वतीने रद्दी संकलीत करून देण्यात आली…लोकसहभागातून विविध नव्या कल्पना लढवून निधी संकलन करून नवनवीन योजना राबविणे हे जायंट्स मेनचे वैशिष्ट्य आहे.
शांताई वृद्धाश्रमाच्या विद्याआधारच्या माध्यमातून दरवर्षी शेकडो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क भरण्यात येते यासाठी बेळगाव परिसरातील विविध संस्था आणि नागरिकांच्या सहकार्याने रद्दी संकलित करून ती विकून शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी निधी जमा केला जातो.
दरवर्षी या उपक्रमाला जायंट्स मेन ही संस्था मदत करीत असते.यावेळी मदन बामणे, विजय बनसुर, प्रेमानंद गुरव, आनंद कुलकर्णी आणि अविनाश पाटील यांनी रद्दी संकलीत करण्यासाठी सहकार्य केले.
संकलित रद्दी विद्याआधारचे प्रमुख माजी महापौर विजय मोरे यांच्याकडे सुपूर्द करताना आली. यावेळी विजय मोरे यांनी प्रतिवर्षी रद्दी देणाऱ्या जायंट्सचे आभार मानले आणि इतरही सामाजिक संघटना आणि नागरिकांनी या उपक्रमाला हातभार लावावा अशी विनंती केली.
यावेळी अध्यक्ष संजय पाटील,सचिव विजय बनसुर, वि.स. सदस्य मोहन कारेकर, फेडरेशन सचिव अनंत लाड,शिवराज पाटील,माजी अध्यक्ष पी आर कदम,उमेश पाटील,लक्ष्मण शिंदे, अविनाश पाटील,आनंद कुलकर्णी आणि अॅलन मोरे उपस्थित होते.कपिलेश्वर रोड येथील जायंट्स भवन येथे हा कार्यक्रम पार पडला.