विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा, आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. बेळगाव ग्रामीण मतदारसंघात सध्या एक पत्रक व्हायरल झाले असून बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांना पत्रक छापणाऱ्यांनी काही प्रश्न विचारले आहेत.
आपण बेळगाव ग्रामीण क्षेत्राचे आमदार असल्याचे विसरलात का? असा प्रश्न या पत्रकाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. त सदर क्षेत्रांमध्ये अडीच लाख मतदारांमध्ये दीड लाख मतदार मराठी आहेत. निवडणुकीच्या वेळी आपण जय मराठी म्हणता आणि निवडून आल्यानंतर आपण लिंगायत पंचमसाली आमदार आहोत असे सांगता.हे आपल्याला शोभते का? असा प्रश्न या पत्रकाद्वारे विचारण्यात आला आहे.
आपण ग्रामीण मतदार क्षेत्रात आमदार आहात. लिंगायत समाजाचे आमदार म्हणून कसे सांगू शकता? असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला आहे.
महाराष्ट्र एकीकरण समितीचे आमदार असते तर सर्व सोयी झाल्या असत्या. पीरनवाडी मधील संगोळी रायण्णा ची मूर्ती स्थापनेच्या वेळी आपलं मराठी प्रेम कुठे गेलं होतं ?आज ग्रामीण क्षेत्रांमध्ये कुठेही मराठी नामफलक दिसत नाहीत .उचगाव ग्रामीण मधले नामफलक काढले तेव्हा आपण कुठे होता ?आपण ग्रामीण मराठी आमदार, लिंगायत आमदार की पंचमसाली आमदार आहेत? अशा प्रकारचे प्रश्न आमदारांना विचारण्यात आले आहेत.
आता या प्रश्नांची उत्तरे आमदार कोणत्या भाषेत देणार? हे स्पष्ट झालेले नाही .विधानपरिषद निवडणुकीत आमदार यांनी आपल्या भावाला उभे केले आहे. यावरून वेगवेगळ्या प्रकारचे आरोप होऊ लागले आहेत. दरम्यान निवडणुकीच्या तोंडावर हे पत्रक व्हायरल झाले असून त्याची चर्चा जोरात सुरू आहे.