सध्यातरी शाळा बंद नाही चिंता न करता मुलांना शाळेला पाठवा असे आवाहन शिक्षणमंत्री बी.सी नागेश यांनी केलं आहे.राज्यभरात 130 विद्यार्थ्यांना झाली आहे लागण नविन कोविड विषाणूमुळे शाळा बंद करणार अशा अफवांना ऊतआला होता यावर शिक्षणमंत्र्यांनी खुलासा केला आहे.
ओमिक्रॉन च्या पाश्वभूमीवर कर्नाटकचे शिक्षण मंत्री बीसी नागेश यांनी शाळा, महाविद्यालये बंद करण्यावर मोठे विधान केले आहे कर्नाटकात दोन ओमिक्रॉनचे रुग्ण सापडल्या नंतर राज्यात अलर्ट देण्यात आला आहे.
सरकार परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे परिस्थिती हाताबाहेर गेली तरच शाळा कॉलेज बंद चा विचार करणार असेही ते म्हणाले.त्यांच्या या वक्तव्यानंतर शाळा कॉलेजना सुट्टी देणार नसल्याची सरकारची भूमिका पुढे आली आहे.