Saturday, November 23, 2024

/

…अन् नगरसेवकाने स्वतःच केली गटारीची स्वच्छता

 belgaum

दगड मातीने बुजलेल्या गटार व ड्रेनेजच्या पाईपची वारंवार तक्रार करून देखील साफसफाई करण्यात येत नसल्यामुळे नगरसेवकाने स्वतःच पुढाकार घेऊन श्रमदानाने गटार स्वच्छ केल्याने नागरिकात प्रशंसोद्गार काढले जात आहेत.

याबाबतची माहिती अशी की, गेल्या एक महिन्यापूर्वी केळकर बाग (गिंडे बोळ) येथे मंजूर झालेली नवीन ड्रेनेज पाईप लाईन आठवड्याभरात घालण्यात आली. परंतु त्यानंतर केलेले खोदकाम व्यवस्थित बुजविण्यात आले नसल्यामुळे अनावश्यक दगड -माती तेथील गटारात आणि ड्रेनेज पाईपच्या तोंडाला साचली होती.

परिणामी सांडपाण्याचा निचरा न होता ते पुन्हा माघारी फिरून आसपासच्या रहिवाशांच्या बाथरूम आणि टॉयलेटमध्ये ओव्हरफ्लो होत होते. यासंदर्भात कंत्राटदाराससह सार्वजनिक बांधकाम खात्याच्या सेक्शन ऑफिसरकडे तक्रार करून देखील त्याची दखल घेतली जात नसल्यामुळे नगरसेवक शंकर पाटील यांनी आज सकाळी आपल्या सहकाऱ्यांसमवेत केळकर बाग येथे जाऊन श्रमदानाने गटारीमध्ये साचलेली 50 टक्के दगडमाती काढून टाकली. त्यांच्या या कृतीमुळे नागरिकात प्रशंसोद्गार काढले जात आहेत.Corporator

दरम्यान त्या ठिकाणी दाखल झालेल्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अभियंत्यांनी येत्या दोन दिवसात संपूर्ण गटार व ड्रेनेज पाईपलाईनची साफसफाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

जर सोमवारपर्यंत ही साफसफाई झाली नाही तर कंत्राटदाराला नोटीस बजावण्याबरोबरच आपण पुन्हा सोमवारी या ठिकाणच्या स्वच्छतेचे काम हाती घेणार असल्याचे नगरसेवक शंकर पाटील यांनी सांगितले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.