Sunday, January 12, 2025

/

‘आबाची गाडी…बाबाची बैल…सख्या हाकणार.. तुक्या बोंबलणार’

 belgaum

बेळगावात खाजगी टोविंग कम्पनीकडून पोलिसांच्या आदेशावरून वाहनांची बेकायदेशीर उचल करण्यात येत आहे. महापालिकेत कोणत्याही प्रकारचा पार्कींग झोन बाबतीत ठराव झालेला नसताना, आणि पार्किंग झोन ठरवले नसताना मनमानी कारभार करत पोलिसांकडून बळजबरीने दंड वसुली केली जात आहे, ती दंड वसुली थांबवावी अशी तक्रार माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी मनपा आयुक्त रुदरेश घाळी यांच्याकडे निवेदना द्वारे केली आहे.

बेळगाव शहरातील रस्ते मनपाच्या मालकीचे आहेत. मनपाने पार्किंग झोन अद्याप घोषित केलेले नाहीत,तरी देखील दुचाकीला 1650 रुपये आणि चारचाकीला 2650 रुपये गाडी मालकाकडून टोविंग वसूल केले जात आहेत.हे बेकायदेशीर आहे. याबाबतीत मनपाने पाऊले उचलावीत अशीही मागणी त्यांनी केली आहे.

बेळगावातील रस्ते मनपाचे,अधिकार दाखवणार पोलीस खाते आणि उचल करणार खाजगी कंपनी या(‘आबाची गाडी…बाबाची बैलं …सख्या हाकणार तुक्या बोंबलणार’)अश्या तुघलकी कारभाराला आळा घालावा अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.शहरात सध्या हेल्मेट सक्ती, पार्किंग आणि मास्क न परिधान केलेल्या वर दंड वसुली केली जात आहे.कोरोना लॉक डाऊन मुळे लोकांना याचा भुर्दंड भरावा लागत आहे यावर नियंत्रण यावे याबाबतीत लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने विचार करावा अशीही त्यांनी मागणी केली आहे.Gunjtkar

मनपाच्या हद्दीत अनेक खाती स्वतःचा अधिकार नसताना वसुली करत आहेत,त्यामुळे मनपाचा महसूल कमी होत आहे, या मनपाच्या कुपोषणाला जबाबदार कोण? असाही प्रश्न त्यांनी विचारला आहे.

बेळगाव स्मार्ट सिटी होणार आहे परंतु अनेक मोकळ्या जागा खाजगी संस्थांना दिल्या जात आहेत हे थांबवलं पाहिजे कारण स्मार्ट सिटी अंतर्गत बहुमजली पार्किंग आणि इतर सुविधा पुरवण्यासाठी जागा शिल्लक नसेल तर महापालिका अडचणीत येण्याची शक्यता आहे. मोठे ट्रक जर गल्लीत पार्किंग केले तर वाहतुकीला अडथळा होत आहे ट्रकथांबा शहराबाहेर करावा,खुल्या जागेत बहुमजली पार्किंग करावेत असेही त्यांनी मनपा आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.