कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आपण परदेशात जाण्याची शक्यता नाकारली आणि दावोस येथे होणारा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे.त्यामुळे मी सद्या परदेशात जाणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले.
“मला दावोसमधील एका कार्यक्रमाला हजेरी लावायची होती, जो पुढे ढकलण्यात आला आहे. परिणामी, माझा परदेश दौरा रद्द झाला आहे,” असे बोम्मई यांनी पत्रकारांना सांगितले.
गुडघ्याशी संबंधित आजारावरील उपचारासाठी मुख्यमंत्री परदेशात जाणार असल्याची चर्चा होती.
तथापि, त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनीही त्यांची परदेशात जाण्याची शक्यता नाकारली, कारण हा आजार शस्त्रक्रिये शिवाय भारतातच बरा होईल.
राज्यातील धर्मांतराला आळा घालण्याचे उद्दिष्ट असलेले धर्मांतर विरोधी विधेयक मंजूर करण्याबाबत बोम्मई म्हणाले की, विधानपरिषदेत भाजपला बहुमत नाही. “आम्हाला वरच्या सभागृहात पाठिंबा नाही.
आमच्याकडे आणखी किमान दोन सदस्य असते तर आम्ही ते पास केले असते,”
हे विधेयक गुरुवारी विधानसभेने मंजूर केले, परंतु विधान परिषदेने त्याला मंजुरी दिलेली नाही.