भाजपच्या कवटगीमठ यांना पहिल्या मताने विजयी करा हे सांगण्यासाठी मी बेळगावला आलोय, दुसरं मत कुणाला घालतात तो त्यांचा विषय आहे. मात्र भाजपला विजयी करणे आमचे ध्येय आहे.
त्यामुळे पहिलं मत देऊन भाजपला आमचे लोकनियुक्त सदस्य विजयी करतील असा विश्वास मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी व्यक्त केला.
आगामी 13 डिसेंबर पासून कर्नाटक विधिमंडळाचं अधिवेशन बेळगावात होणारच याच्यात कोणतीही शंका बाळगण्याचे कारण नाही, असे त्यांनी स्पष्ट केलं. बेळगाव तालुक्यातील किणये जवळील रिजेंटा हॉटेलमध्ये आयोजित भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक झाल्यानंतर पत्रकाराना ते संबोधित करत होते.
हलगा येथील सुवर्ण सौध मध्ये अधिवेशनाची तयारी जोरदार सुरू असून सभापती विश्वेश्वर कागेरी हेगडे आणि बसवराज होरट्टी यांनी पाहणी करून तयारीचा आढावा घेतलेला आहे .बेळगावातील अधिवेशनासाठी बेळगाव जिल्हा प्रशासनाने कोणती तयारी करावी यासाठी देखील सर्व सूचना केल्या आहेत.
गेल्या दोन वर्षांमध्ये कोविड आणि इतर कारणांमुळे सुवर्णसौध मध्ये अधिवेशन घेता आले नव्हते ,मात्र आता यावेळी 13 ते 24 डिसेंबरपर्यंत हिवाळी अधिवेशन होणार आहे .या अधिवेशनामध्ये जास्तीत जास्त उत्तर कर्नाटकातील प्रश्नाविषयी चर्चा करू असे त्यांनी सांगितले.
पुन्हा कोरोनाची लाट येणार आहे. कोरोना मुळे बेळगाव अधिवेशन होईल की नाही याबाबत शंका उपस्थित केल्या जात होत्या ,याबाबत अनेकांनी चर्चा केली होती. मात्र कोणत्याही परिस्थितीत बेळगाव मध्ये हिवाळी अधिवेशन होईल असे त्यांनी स्पष्ट केलं.
बेळगाव अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न असतील किंवा गेल्या महिन्याभरात झालेल्या पावसामुळे पीक नुकसान भरपाई असेल किंवा इतर समस्यांबद्दल आम्ही अवगत आहोत त्याबद्दल या अधिवेशनात चर्चा होईल. पीडित शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाई नक्कीच मिळणार. पावसाळा असो किंवा हिवाळ्यात असो या अगोदर अति वृष्टी किंवा पावसाने नुकसान झाल्यास तीन-चार महिन्यानी नुकसानभरपाई मिळत होती . मात्र आता मी तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. फोटो काढून अर्ज भरून रिपोर्ट पाठवला तर 24 तासाच्या आत मी नुकसानभरपाई देण्याचे काम सुरुवात केलेले आहे.
सोमवार पर्यंत राज्यांमध्ये 422 कोटी पीक नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळालेली आहे .दररोज हा आकडा 50 कोटी 60 कोटी असा वाढत असून मोठ्या प्रमाणात पीक नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळत आहे. असा दावा देखील मुख्यमंत्री बोम्माई यांनी केला.