सांबरा येथील सिद्धकला सामाजिक आणि क्रीडा क्लबच्यावतीने ग्रामीण भागासाठी *आमदार चषक- 2022* भव्य टेनिसबाल क्रिकेट स्पर्धा दि. 2 जानेवारी 2022 पासून आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेसाठी पहिले बक्षीस 51,000/ रु. व चषक, दुसरे बक्षीस – 25,000/ रु. आणि चषक देण्यात येणार आहे. मालिकवीर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट संघ यासह प्रत्येक सामन्यात सामनावीर पुरस्कार देण्यात येणार आहे.
सदर स्पर्धा “एक गांव एक संघ” अशी होणार आहे.नाव नोंदवायची शेवटची तारीख 31 डिसेंबर आहे. इच्छुकांनी 7483516624, 8970999199 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
सांबरा येथील सिद्धकला क्रिकेट संघाच्या सिनियर खेळाडूंच्या पुढाकारातून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.