बेळगाव हाफ मॅरेथॉनची चौथी आवृत्ती कोविड नियमात योग्य पद्धतीने पार पडली. सिपीएड मैदानावरून ध्वज दाखवून या आवृत्तीला प्रारंभ करण्यात आला.असोसिएशन ऑफ इंटरनॅशनल मॅरेथॉन्स ने प्रमाणित केलेली ही स्पर्धा आकर्षण ठरली होती.
लेकव्ह्यू फाऊंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम द्वारे निधी संकलनासाठी उपक्रम म्हणून आयोजित करण्यात आली होती. रेस व्यवस्थापन भागीदार यू टू रन हे होते #YouTooCanRun
या स्पर्धेत 21 हजार हाफ मॅरेथॉन, 10 किलोमीटर आणि 5 किलोमीटर अशा तीन अंतराच्या श्रेणी होत्या. मराठा लाईट च्या सक्रिय सहकार्याने आयोजित मेजर जनरल पी. एस. बाजवा आणि कर्नल मनोज शर्मा यांनी ध्वजवंदन केले. इव्हेंटमध्ये सर्व शर्यतींच्या श्रेणींमध्ये 800 जण सहभागी होते आणि सर्व कोविड योग्य वर्तन जसे की मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग, आणि सर्व सहभागींना दुहेरी लसीकरण केले गेले असल्याची तपासणी करण्यात आली.
सुमारे 35% सहभागी महिला होत्या, ज्यात अनेक प्रथमच धावपटूंचा समावेश होता आणि प त्यांची वेळ निश्चित केली होती.
इंटरनॅशनल अॅक्रिडिएशनमुळे इव्हेंटला पुढील स्तरावर पोहोचवलं जातं ज्यामुळे पात्र होण्यासाठी इतर शहरांमध्ये प्रवास न करता त्यांच्या आवडीच्या आंतरराष्ट्रीय रनिंग इव्हेंटमध्ये सहभागी होता येते. या कार्यक्रमातून निर्माण होणारी अतिरिक्त रक्कम ग्रामीण भागातील शाळांमध्ये शौचालये बांधण्यासाठी दिली जाईल.