आपली जागा असल्याचे सांगून घरे व खाजगी जमिनीवर ताबा दाखवण्याच्या कर्नाटक वक्फ बोर्डाच्या प्रक्रियेवर जिल्हा मुख्य सत्र न्यायाधीशांनी स्थगिती आदेश दिला आहे. यासंदर्भात आता कोणत्याही प्रकारची हालचाल करता येणार नाही असेच न्यायालयाने सांगितले आहे .
या संदर्भातील निर्णय योग्य ती प्रक्रिया झाल्यानंतरच आणि न्यायालयासमोर योग्य ती कागदपत्रे सादर केल्यानंतरच होऊ शकणार आहे.
एकीकडे भाजपच्या धर्मादाय खात्याच्या मंत्री शशिकला जोल्ले वक्फ बोर्डाच्या मालमत्ता संरक्षणासाठी सर्वेक्षणाचा आदेश देऊन राज्यातील वक्त मालमत्तांचे संरक्षण करण्यासाठी प्रयत्नशील असताना यासंदर्भात जमीन मालक आणि नागरिकांच्या लढ्याला न्यायालयाने न्याय दिला असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
केंद्रीय वक्फ परिषदेच्या सदस्यांसमवेत झालेल्या बैठकीत कर्नाटकाच्या धर्मादाय मंत्री शशिकला जोल्ले यांनी वक्फ मालमत्तांच्या संरक्षणाचे आदेश दिले होते. या नंतरच बेळगाव येथील आनंदवाडी आणि परिसरातील नागरिकांच्या जमिनी धोक्यात आल्या होत्या.
या संदर्भात श्रीराम सेना, बेळगाव शेतकरी संघटना व इतर अनेक संघटनांनी जमीन मालकांच्या आणि घर मालकांच्या बाजूने राहणार असल्याची माहिती दिली होती. तसेच त्याला बळकटी दिली होती. जमिनी ताब्यात घेण्यासाठी आलेल्या वक्फ बोर्डाच्या मंडळींना माघारी पाठविण्यात आले होते.
त्यानंतर न्यायालयीन लढा सुरू झाल्यानंतर न्यायालयाने या पद्धतीने जागा जमिनी ताब्यात घेण्याच्या प्रक्रियेवर स्थगिती आदेश दिला असून जमीन मालकांना दिलासा मिळाला आहे.