२००६ साली पहिल्यांदा कर्नाटक शासनाने आपलं अधिवेशन भरवलं तेव्हापासून प्रत्येक वेळी त्यांच्या अधिवेशनाला विरोध दर्शविण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती महामेळाव्याचे आयोजन करत आलेली आहे.
आपला या सिमाभागावर हक्क गाजविण्यासाठी कर्नाटक सरकार इथे अधिवेशन भरवत असते.परवानगी मिळो अथवा ना मिळो कोणत्याही परिस्थितीत अधिवेशनाला विरोध होणारच त्यामुळे शहरातील गल्लोगल्लीत जनजागृती बैठका करून मेळावा यशस्वी करावा असे आवाहन शहर समिती बैठकीत करण्यात आले.
गुरुवारी सायंकाळी शहर समितीची बैठक रामलिंग खिंड गल्लीतील रंगुबाई पॅलेस मध्ये घेण्यात आली सुरुवातीला रणजित चव्हाण पाटील यांनी प्रास्ताविक करत महा मेळाव्याचा उद्देश्य स्पष्ट केला.
महाराष्ट्रातल्या शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या दिग्गज नेत्यांना निमंत्रण देण्यात आले आहे यासाठी महाराष्ट्र मधून नेते उपस्थित रहाणार आहे कानडी सरकार एकीकडे सुप्रीम कोर्टात आपले म्हणणे मांडत नाही मात्र दुसरीकडे बेळगावातील मराठी माणसांना त्रास देण्याचा खटाटोप करत असते या विरोधात मराठी भाषिकांनी एकत्रित येऊन महा मेळाव्याला उपस्थिती दाखवावी असे आवाहन दळवी यांनी केले.
मराठी माणसाची एकजूट दाखवुया आणि महा मेळावा यशस्वी करूया असे विचार कार्यकर्त्यांनी मांडले.