छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या अवमाना प्रकरणी बेळगाव पोलिसांनी आणखी पाच जणांना अटक केली आहे त्यामुळे अटक झालेल्यांची एकूण संख्या 32 वर पोहोचली आहे.
या अगोदर पोलिसांनी 27 जणांना अटक करून त्यांच्यावर कलम 307 खून करण्याचा प्रयत्न करणे अश्या गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले होते.
मार्केट पोलिसांनी पोलिसांनी रविवारी आणखी पाच जणांना अटक केली आहे त्यात राजेंद्र बैलूर रा.भोज गल्ली शहापूर, अभिषेक पुजारी रा. भोज गल्ली शहापूर,बळवंत शिंदोळकर रा.कोनवाळ गल्ली आणि भागेश नंद्याळकर आणखी एक अशी अटक केलेल्यांची नाव आहेत.
रविवारी या पाच जणांना मार्केट पोलिसांनी अटक केले त्यांची रवानगी हिंडलगा कारागृहात करण्यात आली.दरम्यान पोलिसांनी शुक्रवारी रात्री धर्मवीर संभाजी महाराज चौकात झालेल्या दगडफेक प्रकरणी 27 जणांना अगोदर अटक झाली होती त्यानंतर रविवारी पाच जणांना झाली आहे.
पोलिसांनी सदर गुन्हा 61 जणांवर नोंद केलाय त्या अनुषंगाने अनेकांची चौकशी सुरु आहे सी सी टी व्ही आणि न्युजच्या माध्यमातून अटक कारवाई केली जात आहे.बंगळुरू घटनेचे पडसाद सीमाभागासह महाराष्ट्रात उमटले आहेत अश्या परिस्थितीत शांतता प्रस्थापित होणे गरजेचे आहे.