बेंगलोर येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि त्यापाठोपाठ संगोळी रायण्णा यांचा पुतळा विटंबनेच्या घटनेनंतर निर्माण झालेली तणावग्रस्त परिस्थिती आणि ठिकठिकाणी होणारी निदर्शने -आंदोलने लक्षात घेऊन बेळगाव पोलीस आयुक्तालय व्याप्तीत लागू केलेला 144 कलमान्वये जमावबंदीचा आदेशाची मुदत वाढविण्यात आली आहे.
बेंगलोर येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा विटंबनेच्या घटनेनंतर शहरात 144 कलमान्वये जमावबंदीचा आदेश जारी करण्यात आला होता.
मात्र त्यानंतर लगेच वीर संगोळी रायण्णा यांचा पुतळा विटंबनेचा प्रकार घडताच परिस्थिती अधिकच चिघळल्यामुळे बेळगाव पोलीस आयुक्तालय व्याप्तीतील म्हणजे बेळगाव शहर परिसरातील जमावबंदीच्या आदेशाची मुदत वाढविण्यात आली आहे.
पोलीस प्रशासनाकडून आज दुपारी जारी करण्यात आलेल्या नव्या आदेशानुसार आज शनिवारी सकाळी 8 वाजल्यापासून येत्या सोमवार दि 20 डिसेंबर रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत जमावबंदीचा आदेश जारी राहणार आहे.