Tuesday, January 7, 2025

/

बुलंद झाला समितीचा बुरुज…

 belgaum

मी समितीचा होतो,समिती माझ्या रक्तात भिनलेली आहे.प्रत्येक ग्रामपंचायतीवर समितीचा भगवा फडकला पाहिजे यासाठी मी दुसऱ्या गोटात असलो तरी प्रयत्न केलेले आहेत.

समितीच्या प्रत्येक विजयासाठी शिवाजी सुंठकर आता झोकून काम करणार आहे, अनेकांनी मला एकी करण्यासाठी सुचवले होते ती एकी आज झाली.माजी आमदार मनोहर किणेकर पुढील लढ्याच्या दिशा देतील तसे आम्ही जोरदारपणे लढत देऊ असे शिवाजी सुंठकर घरवापसी केल्यावर म्हणाले.

शिवाजी सुंठकर हे समितीचे सळसळतं व्यक्तिमत्व, प्रत्येक लढाईत शिवाजी सुंठकर आघाडीवर असायचे पण ते भाजपवासी झाले आणि ही जागा रीती भासू लागली. शिवाजी सुंठकर समिती सोबत नसणे हा मराठी माणसाचा सल होता. आज नेताजी पालकर आमच्यात आला आणि आमची सेना बळकट झाली.आज हजारोच्या संख्येने ग्रामीण समितीतील मावळे रस्त्यावर उतरतील त्यावेळी विरोधकाना धडकी भरवणारी समितीची ताकत दिसेल. मराठी माणसाचे हे स्वप्न आज एकीकरणामुळे पूर्ण झाले आहे.Sunthkar

आज हजारो कार्यकर्ते कार्तिकी पौर्णिमे दिवशी जल्लोषाची दिवाळी करतील यात काही शंकाच नाही. ग्रामीण भागात प्रत्येक माऊली तुळशी जवळ आज आनंदाचा दिवा लावेल. मराठी माणसाने शड्डू ठोकला आहे आता विरोधकांनो तुम्ही सावध व्हा.
वाट चुकली तरी आमची माणसे आमचीच असतात.आमचा भगवा शिवाजी महाराजांचा आहे. त्याची सावली मराठी माणसाला नेहमीच आश्वासक वाटत असते म्हणूनच मराठी माणूस कुठेही गेला तरी या भगव्याचा सावलीला विसरत नाही.

मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष दळवी आणि कार्याध्यक्ष मनोहर किणेकर यांनी आजच्या बैठकीतच रणशिंग फुंकले आहे. शिवाजी सुंठकर यांच्या हातात मशाल देऊन सीमाभागात रान उठवण्यास सांगितले आहे.आगामी कर्नाटक अधिवेशन विरोधातील मेळावा असो, शेतकऱ्यांनवरील अन्याय किंवा जमीन संपादन असो अगर गावागावात जनजागृती असो आता सुंठकरांची हालगी कडाडलीच पाहिजे असा आदेश दिला आहे.

एक तपाचा दुरावा या तालुका समितीतील एकीमुळे दूर झालेला आहे युवा आघाडीचे अध्यक्ष संतोष मंडलिक, चेतन पाटील,दीपक पावशे, महेश जुवेकर,दत्ता उघाड़े आदींनी ही एकी घडवली आणि समितीतली नवी पिढी जोरदार पणे कामाला लागल्याचे सिद्ध केले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.