Monday, December 30, 2024

/

‘या’ उपनगरांमधील वीज पुरवठा उद्या खंडित

 belgaum

हेस्काॅमकडून तातडीचे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्यामुळे उद्या रविवार दि. 28 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत वडगाव, शहापूर, अनगोळ, भाग्यनगर आदी परिसरातील वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे.

प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिलेल्या माहितीनुसार एफ -4 फिडर कार्यक्षेत्रातील भारतनगर, लक्ष्मीनगर, गणेशपुर, जेड गल्ली, अळवाण गल्ली, मंगाईनगर, पाटील गल्ली, येरमाळ रोड,

बाजार गल्ली, तेग्गीन गल्ली, चावडी गल्ली, येळ्ळूर रोड, दत्त गल्ली, राजवाडा कंपाऊंड, सर्वोदय कॉलनी, नाझर कॅम्प, रामदेव गल्ली, विष्णू गल्ली, शहापूर, मेघदूत सोसायटी, नाथ पै सर्कल या भागातील वीज पुरवठा रविवारी खंडित राहणार आहे.

त्याचप्रमाणे एफ -12 फिडरमधील अनगोळ, विद्यानगर, आंबेडकरनगर, राजहंस गल्ली, महावीरनगर, भांदुर गल्ली, संत मीरा स्कूल रोड, अनगोळ -वडगाव रोड, गुलमोहर कॉलनी, समृद्धी कॉलनी, पारिजात कॉलनी,

ओमकारनगर. एफ -13 फिडरमधील भाग्यनगर पहिला ते दहावा क्रॉसपर्यंत. एफ -14 फिडर कार्यक्षेत्रातील आनंदनगर संभाजीनगर, केएलई येळळूर रोड, आदर्शनगर, हिंदवाडी, जेल शाळा, फुले गल्ली, अन्नपूर्णेश्वरीनगर, गणेश नगर. एफ -5 फिडरमधील वडगाव, विणकर कॉलनी, निजामीयानगर, रयत गल्ली, विष्णू गल्ली आणि एफ -11 फिडर कार्यक्षेत्रातील सुभाष मार्केट -हिंदवाडी, रानडे कॉलनी, गोवावेस परिसरातील वीजपुरवठा उद्या रविवारी खंडित राहणार आहे.

तरी नागरिकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन हेस्काॅमच्या कार्यकारी अभियंत्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.