कोरोनामुळे यंदा सलग दुसऱ्या वर्षी शाळा विलंबाने सुरू झाल्या असून पुढील 2022 -23 या शैक्षणिक वर्षास पुन्हा असा विलंब होऊ नये याची खबरदारी म्हणून पुढील वर्षी उन्हाळी सुट्टीत मोठी कपात केली जाणार आहे. विद्यार्थ्यांना आगामी उन्हाळी सुट्टी फक्त 28 दिवसांची मिळणार आहे.
यंदाचे शैक्षणिक वर्ष एप्रिल 2001 -22 पर्यंत पूर्ण होणार आहे. शाळा व्यवस्थित सुरू झाल्याने शिक्षण खात्याने आता विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार माध्यान्ह आहार वितरण, दूध वाटप यासह समुदाय दत्त कार्यक्रम घेण्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्याप्रमाणे आता विविध परीक्षांचे नियोजन करण्याचे काम शिक्षण खात्याने सुरू केले आहे. यंदा दुसऱ्या वर्षी कोरोनामुळे शाळा विलंबाने सुरू झाल्या आहेत. आता पुढील 2022 -23 शैक्षणिक वर्ष सुरू होण्यास पुन्हा विलंब होऊ नये याची खबरदारी आत्तापासून शिक्षकांना शिक्षण खात्याकडून घेतले जात आहे त्यानुसार पुढील वर्षी उन्हाळी सुट्टीत मोठी कपात केले जाणार आहे.
दरवर्षी मार्च महिन्यात परीक्षा घेऊन पहिली ते नववीचा निकाल 10 एप्रिलपर्यंत जाहीर केला जातो. त्यानंतर उन्हाळी सुट्टीला सुरुवात होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना अधिक दिवस सुट्टीचा लाभ घेता येतो. मात्र पुढील वर्षाच्या शैक्षणिक वर्षाला वेळेवर सुरुवात व्हावी यासाठी पहिली ते नववीच्या परीक्षा एप्रिल महिन्यात घेऊन निकाल मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर करण्याचे नियोजन आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टी मिळणार आहे. दहावीची परीक्षा मे महिन्यात घेऊन जून महिन्यात निकाल जाहीर करण्याचा विचार शिक्षण खात्याने चालविला आहे. याबाबतची अधिकृत माहिती येत्या कांही दिवसात शाळांना दिली जाणार आहे. तसेच दहावीचा अभ्यासक्रम वेळेत पूर्ण होईल यादृष्टीने वेळापत्रक तयार करण्यात येणार आहे. दरम्यान पुढील वर्षी अभ्यासक्रमात कोणत्याही प्रकारची कपात न करण्याचा निर्णय शिक्षण खात्याने घेतला असल्याची माहिती शिक्षण खात्याकडून उपलब्ध झाली आहे.