विद्यार्थ्यांनी चांगली मेहनत करून नावलौकिक मिळवावा. अनेक विद्यार्थी अभ्यास करून काय साध्य होणार असा विचार करत असतात पण प्रथमपासून जर आपण चांगली मेहनत घेतली तर नोकरीमध्ये मोठ्या हुद्यापर्यंत जाऊ शकता,विदेशात नोकरी करू शकता असे प्रेमानंद गुरव यांनी सांगितले.
चौदा नोव्हेंबर, बालदिनानिमित्त कै श्वेता मोहन कारेकर हिच्या स्मरणार्थ जायंट्स सखीच्या वतीने सखी बालगौरव पुरस्कार वितरित करण्यात आला त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर अध्यक्षा निता पाटील, डॉ विनोद गायकवाड, फेडरेशन संचालिका ज्योती अनगोळकर उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची सुरवात दीपप्रज्वलनाने झाली.
उपस्थित मान्यवर, गौरवमुर्तीचे स्वागत ज्योती अनगोळकर यांनी केले.त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते महिला विद्यालयची विद्यार्थीनी अक्षता सांबरेकर आणि मराठी प्राथमिक शाळा नंबर ५ ची विद्यार्थीनी संस्कृती हुदलीकर याना सन्मानचिन्ह ,रोख एक हजार रुपये ,शैक्षणिक साहित्य देऊन गौरविण्यात आले.
त्यानंतर प्रमुख पाहुणे डॉ विनोद गायकवाड यांनी सखीच्या या उपक्रमाचे कौतुक करताना विद्यार्थीनीना प्रेरणा मिळावी म्हणून हा पुरस्कार आपण दरवर्षी देत आहात असेच कार्य भविष्यात सुरू ठेवावे असे सांगितले.
आणि हा पुरस्कार मिळाल्याने अक्षता आणि संस्कृतीची जबाबदारी वाढली असल्याचे सांगितले.
दोन्ही गौरवमूर्तींनी जायंट्स सखीच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली.अध्यक्षीय समारोप निता पाटील यांनी केला.
या कार्यक्रमास मोहन कारेकर, मनीषा कारेकर चंद्रा चोपडे विद्या सरनोबत लता कंग्राळकर शीतल नेसरीकर अर्चना पाटील ज्योती पवार अर्पणा पाटील सविता मोरे या उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार सेक्रेटरी शितल पाटील यांनी केले