आपला मराठी बाणा दाखवण्यासाठी प्रत्येक घरावर भगवा झेंडा फडकवा असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने केलं आहे.मराठी माणसाच्या अस्मितेचा प्रतिक भगवा झेंडा प्रत्येक घरावर फडकला पाहिजे.छ्त्रपती शिवरायांचा झेंडा ,दिल्लीच्या छाताडावर रोवलेला भगवा प्रत्येक मराठी माणसाच्या घरावर दिमाखात फडकावा असेही आवाहन केलं आहे.
‘जिथे असेल शिवरायाचा मावळा त्या प्रत्येक घरावर फडकतोय भगवा झेंडा’ही ओळख बेळगावची करण्यासाठी प्रत्येक घरावर दिवाळी पुरतेचं नव्हे तर कायमस्वरूपी झेंडे फडकावा असे 25 ऑक्टोबर मोर्चात समिती नेत्यांनी केलं होतं त्यावर आता अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली आहे.
बेळगाव हुन जाणाऱ्या प्रत्येक विमानाला बेळगाव भगवेमय दिसले पाहिजेत तेंव्हाचं दिल्लीच्या राज्यकर्त्यांना समजेल की हे गाव मराठ्यांचे आहे म्हणून आम्ही या मोहिमेत देखील मागे हटणार नाही अशी भावना बेळगाव तालुक्यातील युवकांत निर्माण झाली आहे.
तालुका समिती युवा आघाडीचे अध्यक्ष संतोष मंडलिक यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव तालुक्यातील अनेक युवकांनी गावा गावांत भगवे वादळ उठायला सुरूवात केली आहे. ग्रामीण भागातील युवक जोशात आले आहेत. ही भगवीमय लहर अख्या बेळगावभर काही दिवसांत पसरणार आहे. मंडलिक आग्रहाने आवाहन करतात ज्यांची मराठीवर श्रद्धा आहे त्यांनी भगवा झेंडा सतत आपल्या घरावर फडकवत ठेवला पाहिजे.
बेळगाव मनपावर भगवा फडकावण्याचं मराठी माणसाचे स्वप्न बेळगाव भगवमय करून करूया. या मोहिमेची सुरुवात आम्ही बेनकनहळळी तून केली आहे अशी माहिती मंडलिक यांनी बेळगाव live कडे बोलताना दिली.दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती युवा आघाडीचे अध्यक्ष संतोष मंडलिक यांनी आपल्या सहकाऱ्यांसह याची सुरुवात केली आहे.
ग्रामीण भागातील जनता ही कोणत्याही उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद देणारी असते. सीमा लढ्यातील आज वरची आंदोलन तालुक्यातील जनतेनेच यशस्वी करण्यास सिंहाचा वाटा उचलला आहे यावेळी तालुक्यातून हा उपक्रम जोरदारपणे हवा पकडला आहे आणि शहराची जनता ही त्याकडे औत्सुक्याने बघत आहे. युवा आघाडीचे हे नवे आंदोलन यशस्वी होईल यावर तरुणाई आशावादी आहे.
https://www.instagram.com/tv/CV5DxbKq6ut/?utm_medium=copy_link