Sunday, January 5, 2025

/

पहिलं मत कवटगीमठ यांना तर दुसर मत काँग्रेसला पाडवायला- रमेश जारकीहोळी

 belgaum

विधान परिषदेच्या बेळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत पहिले मत पक्षाचे अधिकृत उमेदवार महांतेश कवटगीमठ यांना द्यायचे तर भाजपचा एकच उमेदवार असल्यामुळे दुसरे मत प्रामुख्याने काँग्रेसचा पाडण्यासाठी अपक्ष उमेदवाराला घालायचे असे माझे ठरले आहे. तथापि भाजप हायकमांडचे नेते काय म्हणतात त्यानुसार सर्वकाही ठरेल, अशी माहिती गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी यांनी आज दिली.

आपले बंधू लखन जारकीहोळी विधान परिषदेची निवडणूक अपक्ष म्हणून लढणार आहेत का? या पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना आमदार रमेश जारकीहोळी बोलत होते. लखन जारकीहोळी हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविणार असल्याचे मला प्रसारमाध्यमांकडूनच समजले आहे. त्यांची माझी प्रत्यक्ष भेट अद्याप झालेली नाही. मात्र आमचे पहिले प्राधान्य कवटगीमठ यांना निवडून आणणे हे असणार आहे आणि दुसरे मत काँग्रेस कसे पराभूत होईल या दृष्टीने विचार करून टाकले जाणार आहे असेही त्यांनी सांगितले.

मागील विधान परिषद निवडणुकीत प्रसंगी मी काँग्रेसमध्ये होतो. त्यावेळी मी जास्तीत जास्त मते प्राधान्याने पक्षाचे उमेदवार विवेकराव पाटील यांना घातली. त्यामुळे कवटगीमठ मागे पडले होते. मात्र आता मी भाजपात असल्याने माझे पहिले प्राधान्य भाजप असून दुसरे प्राधान्य काँग्रेसला पराभूत करणे हे असणार आहे असेही रमेश जारकीहोळी यांनी स्पष्ट केले. काँग्रेसकडून विवेकराव पाटील यांच्यावर अन्याय झाला आहे. त्यासाठी मी स्वतः विवेकराव पाटील यांची भेट घेणार आहे. त्यांना उमेदवारी नाकारून काँग्रेसने अन्याय केला आहे. एकंदर राजकारण कांहीही असो कोणत्याही परिस्थितीत मी काँग्रेसचा पराभव करणारच असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

विधानपरिषद निवडणुकीचे पडघम जोरदार वाजू लागले आहेत. राजकिय नेत्यांच्या प्रतिक्रिया वातावरण गरम करत आहेत. अनेक बाजूने सध्या वादग्रस्त ठरलेले रमेश जारकीहोळी यांनी केलेले एक विधान सध्या जोरदार चर्चेत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.