भाजप नेते रमेश जारकीहोळी विद्यमान विधानपरिषद सदस्य विवेकराव पाटील यांना लवकरच भाजपच्या मार्गावर घेऊन जाणार आहेत .विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रमेश जारकीहोळी यांनी गळ घातली आणि विवेकराव पाटील यांनी ती मान्य केली यामुळे आता एका जागेवर भाजप तर दुसऱ्या जागेवर अपक्ष लखन जारकीहोळी यांचे पारडे जड बनले आहे त्यामुळे तर काँग्रेस ची अवस्था निष्फळ बनल्याची चर्चा रंगू लागली आहे.
मागील विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार महांतेश कवटगीमठ आणि काँग्रेसतर्फे विवेकराव पाटील या निवडणुकीत उभे होते त्यावेळी जारकीहोळी ब्रदर्स च्या मदतीने विवेकराव निवडून आले आणि त्यांनी विधान परिषद सदस्य म्हणून काम पाहिले. आता राजकीय संदर्भ पण बदलले आहेत .
पूर्वी काँग्रेसमध्ये असणारे रमेश जारकीहोळी भाजपमध्ये गेले. त्यामुळे या निवडणुकीत विवेकराव पाटील यांनी भाजपमध्ये यावे .भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा अशी विनंती रमेश जारकीहोळी यांनी केली.
शनिवारी रमेश जारकीहोळी यांची भेट घेऊन त्यांना भाजपावासी होण्याची गळ घातली आहे विवेकराव पाटील यांनी ते मान्य केले यामुळे आता नवीन राजकीय समीकरण पाहायला मिळणार आहेत.
काँग्रेसने दिलेल्या उमेदवाराचा पाडाव करण्यासाठी काँग्रेसमधील निष्ठावंतांना भाजपच्या गोटात सामावून घेऊन एका जागेसाठी भाजप तर दुसऱ्या जागेसाठी काँग्रेसला पाडवण्याचा निर्णय या पद्धतीने ही निवडणूक होणार आहे.
मागील विधानपरिषद सदस्यत्व रमेश जारकीहोळी आणि इतर बंधूंच्या आशीर्वादाने मिळाल्यामुळे विवेकराव पाटील हे ते बंधू काय सांगतील ती पूर्व दिशा त्या पद्धतीने काम करणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
ग्रामीण मध्ये जोरदार प्रचार
रमेश जारकीहोळी यांनी बेळगाव ग्रामीण मतदार संघावर विशेष लक्ष केंद्रित केले असून शनिवारी सांबरा भागातील लोकनियुक्त सदस्यांना भेटून भाजपला मतदान करण्याचे आवाहन करत जोरदार प्रचार केला. बेळगाव ग्रामीण मतदारसंघात वर जारकीहोळी यांचे विशेष लक्ष आहे.