कर्नाटक पोलिसांनी दक्षिण कन्नड जिल्ह्यात दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली एका ३४ वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे, अशी माहिती राज्य पोलिस महासंचालकांनी नुकतीच दिली.हा प्रकार गंभीर असून त्यावर कठोर पावले उचलली जात आहेत.
केशव असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. जो उप्पिनगडी शहराजवळील मडमिटिनारू गावचा रहिवासी आहे. त्याला लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा POCSO अंतर्गत अटक करण्यात आली आहे.
आपल्या मुलीचे आरोपीसोबत शारिरीक संबंध असल्याबाबत पालकांना काहीच माहिती नव्हती. तिला ओटीपोटात ट्यूमर झाल्याचा संशय आला आणि तिला मंगळुर येथील रुग्णालयात दाखल केले.
तिची चाचणी करणाऱ्या डॉक्टरांना मुलगी गरोदर असल्याचे आढळून आले. त्यानंतर अल्पवयीन मुलीने मुलीला जन्म दिला. ही बाब उप्पीनगडी पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली.यानंतर कारवाईला सुरुवात झाली.