खेळाच्या मैदानांचा राजकीय कारणासाठी वापर केल्यास त्याची कशी दुरावस्था होते याची प्रचिती सध्या शहरातील सरदार्स मैदानाकडे पाहिल्यानंतर येत आहे. सध्या या मैदानावर निवडणूक पत्रकांचा कचरा पसरला असल्यामुळे क्रीडापटू आणि क्रीडाप्रेमींमध्ये तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा परवा शेवटचा दिवस होता. त्यादिवशी कॉंग्रेस आणि अपक्ष उमेदवारांचे समर्थक सरदार मैदानावर मोठ्या संख्येने जमा झाले होते. शक्ती प्रदर्शन करू इच्छिणाऱ्या आपल्या उमेदवारांसाठी मैदानावर गर्दी केलेल्या या समर्थकांना पत्रके वाटण्यात आली होती.
सध्या त्या पत्रकांचा कचरा मैदानात सर्वत्र पसरून अस्वच्छता निर्माण झाली आहे. या स्वच्छतेकडे लोकप्रतिनिधींसह सर्वांचेच दुर्लक्ष झालेले आहे. खरेतर शहर स्वच्छतेबरोबरच मैदानाची स्वच्छता व निगा राखणे ही महापालिकेची जबाबदारी असते.
त्यामुळे सरदार्स मैदानावर निवडणूक पत्रकांचा जो मोठ्या प्रमाणात कचरा पडून आहे, त्याला जबाबदार कोण? कचरा केलेली राजकीय मंडळी की मैदानावर पडलेला कचरा न काढणारी महापालिका?असा संतप्त सवाल केला जात आहे.
राजकीय परिपत्रिके पडलेल्या या प्रकारची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली रंगली राजकीय नेतेमंडळी पक्ष आणि शहराची स्वच्छता बघणारी मनपा आणि त्याचे अधिकारी यांच्यावर वेगवेगळ्या पद्धतीनं टीका केली जात आहे.मनपा कर्मचाऱ्यांना जाग येईल का? राजकीय पक्ष सुधारतील का? असाही सवाल विचारला जात आहे.