भाजपप्रणित राज्य असलेल्या ठिकाणी पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्याचा निर्णय घेऊन भाजप सरकारने एक वेगळाच मुद्दा पुढे आणला आहे .
मात्र तरीही कर्नाटक आणि गोवा या दोन राज्यांमध्ये दोन्हीकडे भाजप असले तरी पेट्रोल आणि डिझेलचे दर वेगवेगळे असल्याचे स्पष्ट झाले असून याबद्दल नागरिकांत चर्चा आहे.
बेळगाव पेक्षा 4.53 रुपये कमी दराने गोव्यामध्ये एक लिटर पेट्रोल मिळत असल्याची माहिती शुक्रवारी उघड झाली. गोव्याच्या वास्को शहरात 95.79 रुपये लिटर पेट्रोल होते.
त्याचवेळी बेळगावात 100.32 रुपये आणि कोल्हापुरात 110.15 रुपये असा दर पाहायला मिळाला आहे. डिझेलच्या बाबतीतही असाच फरक दिसून आला असून वास्को मध्ये 86. 70 तर बेळगाव मध्ये 84.80 आणि कोल्हापूरमध्ये 92.95 रुपये प्रति लिटर असा दर डिझेल च्या बाबतीत पाहायला मिळाला आहे.
राज्य सरकार ज्या पद्धतीने कर कमी करतात त्यावरून पेट्रोल आणि डिझेलचा दर कमी होतो. या पार्श्वभूमीवर गोवा सरकार आणि कर्नाटक सरकारने कमी केलेला कर टक्केवारीचा फरक नागरिकांना पाहता येत असून दोन्हीकडे भाजप असले तरी फरक वेगळा वेगळा कसा काय? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला.