Thursday, December 19, 2024

/

घरा समोर पार्क केलेल्या कारची मोडतोड

 belgaum

अज्ञातां कडून घरासमोर पार्क केलेल्या कारची मोडतोड केल्याची घटना बेळगाव शहापूर सराफ गल्ली येथे शनिवारी मध्यरात्री घडली आहे.
या प्रकरणी शहापूर पोलिसांत फिर्याद दाखल करण्यात आली आहे. भरवस्तीत घरासमोरील कारची मोडतोड केल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की नेहमी प्रमाणे सराफ गल्ली रहिवाशी सराफी व्यावसायिक गुणवन्त पाटील यांनी मारुती कार आपल्या घरासमोर पार्क केली होती शुक्रवारी रात्री सव्वाबाराच्या सुमारास काही अज्ञातांनी चोरीच्या उद्देशाने कारवर दगडफेक करून मोडतोड केली व गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले.Car attack

दरम्यान रात्रीचं घटनास्थळी शहापूर पोलिसांनी भेट दिली असून कारची मोडतोड करणाऱ्यांचा शोध घेतला जात आहे.अलीकडे घरासमोर लावलेल्या गाड्यांची मोडतोड करून चोरीच्या घटना वाढल्या आहेत अश्या घटनांवर नियंत्रण आणावे अशी मागणी वाढू लागली आहे.

सराफ गल्ली व्यतिरिक्त कचेरी गल्लीत देखील घरासमोर लावलेल्या तीन कार गाड्यांच्या काचा फोडल्या आहेत.त्यामुळे पार्किंग केलेल्या गाड्या वरील हल्ले वाढले आहेत याची दखल पोलिसांनी घ्यावी अशीही मागणी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.